नवी दिल्ली - कोरोना आणि घोषित करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आर्थिक विकासदर हा २.६ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
स्टेट बँकेच्या इकोरॅप या संशोधन अहवालात देशाच्या जीडीपीबाबत अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विकासदर हा ५ टक्क्यांवरून ४.५ टक्के होईल, असे इकोरॅपच्या अहवालात म्हटले आहे. तर चालू वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकासदर हा २.५ टक्के राहिल, असेही अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-लॉकडाऊन: सुनील ग्रोव्हर घराबाहेर पडला, पोलिसांनी केली धुलाई
लॉक डाऊनमुळे देशाच्या जीडीपीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विकासदर हा २.६ टक्के होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच विकासदर घसरेला दिसून येईल, असा इकोरॅप अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-राहुल बजाज सरकारला करणार १०० कोटींची मदत; शरद पवारांनी ट्विट करून केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लोकांनी सामाजिक अंतर ठेवून नागरिकांनी घरातच राहावे, असे पंतप्रधान मोदींनी आवाहन केले.