नवी दिल्ली - कोरोनाची भीती पसरली असतानाच लोकसभेत 'वित्तीय विधेयक २०२०' आवाजी मतांनी चर्चेविना आज मंजूर करण्यात आले. या मंजुरीने पुढील आर्थिक वर्षाचा खर्च हा मार्चपासून करता येणार आहे. दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रस्ताव ठेवण्यात आलेल्या विधेयकावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. मात्र, काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी आणि डीएमकेचे नेता टी.आर. बालू यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दिलासा देणाऱ्या पॅकेजची मागणी केली.
हेही वाचा-कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाही शेअर बाजार सुरू : गुंतवणूकदारांना 'ही' आहे भीती
विधेयक मंजूर करायला विरोध नाही. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वित्तिय पॅकेजची घोषणा करावी, अशी विनंती असल्याचे अधिर रंजन चौधरी यांनी म्हटले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वित्तीय विधेयक २०२० मंजूर झाल्याची घोषणा केली.
हेही वाचा-दिलासादायक! रिलायन्स रोज १ लाख मास्कचे करणार उत्पादन