ETV Bharat / business

व्यवसाय विश्वास निर्देशांकात १५ टक्क्यांची घसरण; एनसीएईआर सर्व्हे

सर्व आर्थिक स्थिती येत्या सहा महिन्यात सुधारेल का, या प्रश्नाला सर्वात अधिक नकारात्मक उत्तर मिळाले आहे. एनसीएईआरच्या माहितीनुसार जुलै २०१९ मध्ये सकारात्मक उत्तरांचे प्रमाण हे ५८.९ टक्के होते. हे प्रमाण ऑक्टोबर २०१९ मध्ये घसरून ४६.३ टक्के झाले आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 12, 2019, 7:21 PM IST

नवी दिल्ली - गेल्या काही तिमाहीत आर्थिक परिस्थिती आणि व्यवसायांसाठी वातावरण वाईट झाल्याचे 'एनसीएईआर'च्या सर्व्हेमध्ये दिसून आले. व्यवसाय विश्वास निर्देशांक मागील तिमाहीच्या तुलनेत ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या तिमाहीत १५.३ टक्क्यांनी घसरला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये सर्वच क्षेत्रातील विश्वास निर्देशांक हा २२.५ टक्क्यांनी घसरला आहे. एनसीएईआरचा (नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च) व्यवसाय विश्वास निर्देशांक (बीसीआय) हा भारतीय उद्योगाच्या सर्वच क्षेत्रातील भावना दर्शवित असतो. एनसीएईआरने ६०० भारतीय कंपन्यांचा सर्व्हे करून निष्कर्ष जाहीर केले आहेत.

सर्व आर्थिक स्थिती येत्या सहा महिन्यात सुधारेल का, या प्रश्नाला सर्वात अधिक नकारात्मक उत्तर मिळाले आहे. एनसीएईआरच्या माहितीनुसार जुलै २०१९ मध्ये सकारात्मक उत्तरांचे प्रमाण हे ५८.९ टक्के होते. हे प्रमाण ऑक्टोबर २०१९ मध्ये घसरून ४६.३ टक्के झाले आहे.

हेही वाचा-व्होडोफोनची केंद्र सरकारकडे 'ही' आहे अंतिम मागणी; अन्यथा देशातील थांबविणार गुंतवणूक

कंपन्यांची आर्थिक स्थिती येत्या सहा महिन्यात सुधारेल का या प्रश्नावर जुलैतील सर्व्हेमध्ये ४८.८ टक्के लोकांनी सकारात्मक उत्तरे दिली होती. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये ३९.३ टक्के लोकांनी सकारात्मक उत्तरे दिली आहेत. खासगी मालकीच्या कंपन्यांचा व्यवसाय विश्वास कमी झाला आहे. तर सरकारी कंपन्यांची व्यवसाय विश्वास हा जुलैच्या तुलनेत ऑक्टोबर २०१९ मध्ये १५.६ टक्क्यांनी वाढली आहे.

एनसीएईआर ही १९५६ मध्ये खासगी-सरकारी भागीदारी तत्वानुसार सुरू झालेली संस्था आहे. या संस्थेला खासगी आणि सरकारी अशा दोन्ही माध्यमातून निधी दिला जातो.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.