ETV Bharat / business

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; ३० जानेवारीला पंतप्रधान घेणार सर्वपक्षीय बैठक - संसदीय अर्थसकंल्पीय अधिवेशन न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राजकीय पक्षांची ३० जानेवारीला ऑनलाईन बैठक घेणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 22, 2021, 6:50 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा समोर ठेवणार असल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राजकीय पक्षांची ३० जानेवारीला ऑनलाईन बैठक घेणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची प्रक्रिया आहे. मात्र, यंदा ही बैठक संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा-केंद्रीयर्थसंकल्प २०२१: प्राप्तिकरात दिलासा मिळावा, स्टार्टअपची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीला सर्व पक्षांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंजेडा समोर ठेवणार आहे. तसेच विरोधकांच्या सूचना सरकार ऐकणार असल्याचे संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा-अर्थसंकल्पात कामगार आणि शिक्षणात सुधारणा कराव्यात-एचआर तज्ज्ञांची अपेक्षा

दोन टप्प्या असणार अर्थसंकल्पीय अधिवेशन-

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २९ जानेवारीला सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात असणार आहे. पहिला टप्प्यात अधिवेशन २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अधिवेशन हे ८ मार्च ते ८ एप्रिल असणार आहे. संसदेचे कामकाज हे दोन सत्रात चालणार आहे. राज्यसभेचे कामकाज हे सकाळच्या सत्रात, तर लोकसभेचे कामकाज हे संध्याकाळच्या सत्रात असणार आहे. कोरोनाच्या काळात अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली.

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.