ETV Bharat / business

'आणखी आर्थिक पॅकेज देण्याचा पर्याय सरकारने बंद केला नाही' - Indian economy latest news

आगामी सणाच्या मुहुर्तावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १२ ऑक्टोबरला एलटीसी कॅश व्हाउचर स्किम आणि स्पेशल फेस्टिव्हल अ‌ॅडव्हान्स स्किमची घोषण केली होती. त्यानंतर आर्थिक पॅकेज देण्याचा सरकारकडे पर्याय असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : Oct 20, 2020, 12:40 PM IST

नवी दिल्ली - महामारीच्या संकटात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी प्रोत्साहनपर पॅकेज देण्याचा पर्याय सरकारने बंद केला नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. त्या केंद्रीय वित्त आयोगाचे १५ वे चेअरमन एन. के. सिंग यांच्या आत्मचरित्राचे ऑनलाईन प्रकाशन करताना बोलत होत्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एन. के. सिंग यांचे 'पोर्टेट्रस ऑफ पॉवर हाफ अ सेंच्युअरी ऑफ बिईंग अ‌ॅट रिंगसाईड' या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. त्यावेळी बोलताना सीतारामन म्हणाल्या, की सर्व क्षेत्रांकडून मिळालेल्या माहितीवर खूप विचार करून सर्व घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्रांमधून आलेल्या सूचनांवर केंद्रीय अर्थमंत्रालयांसह पंतप्रधान कार्यालयाने काम केले होते, असेही सीतारामन यांनी सांगितले.

केंद्र सरकारने ग्राहकांची मागणी आणि राज्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी आर्थिक सुधारणांची आठवडाभरापूर्वी घोषणा केली होती. आगामी सणाच्या मुहुर्तावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १२ ऑक्टोबरला एलटीसी कॅश व्हाउचर स्किम आणि स्पेशल फेस्टिव्हल अ‌ॅडव्हान्स स्किमची घोषण केली होती. तर केंद्र सरकारने मे महिन्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली होती. केंद्र सरकारने जाहीर केलेले दुसरे आर्थिक पॅकेज ही रिअल जीडीपीच्या केवळ ०.२ टक्के असल्याचे मूडीज या पतमानांकन संस्थेने अहवालात म्हटले आहे. तर जीडीपीच्या केवळ एकूण १.२ टक्के पॅकेज असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.