ETV Bharat / business

कोरोनाने जगभरातील २.५ कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार - कोरोना परिणाम

आंतरराष्ट्रीय कामगार संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे. या संस्थेने 'कोविड -१९ आणि जगाचे काम : परिणाम आणि प्रतिसाद' असा अहवाल तयार केला आहे. या अहवालात कामगारांचे कामाच्या ठिकाणी संरक्षण, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणे या तीन मुख्य मुद्द्यावर भर दिला आहे.

Employment
नोकऱ्या
author img

By

Published : Mar 19, 2020, 6:35 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ - कोरोनाने जगभरातील २.५ कोटी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कामगार संस्थेने (आयएलओ) व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय धोरणात समन्वय झाला तर हे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, असे या संस्थेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे. या संस्थेने 'कोविड -१९ आणि जगाचे काम : परिणाम आणि प्रतिसाद' असा अहवाल तयार केला आहे. या अहवालात कामगारांचे कामाच्या ठिकाणी संरक्षण, अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणे या तीन मुख्य मुद्द्यावर भर दिला आहे. त्यासाठी तातडीने आणि मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय धोरण समन्वयाने राबवावे, असे आयएलओने म्हटले आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षा, वित्तीय आणि कर दिलासा आदींचा समावेश आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका... तब्बल ३.८ कोटी भारतीयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता

वित्तीय आणि पतधोरणांची सुधारणा करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. कोविड -१९ मुळे आर्थिक आणि कामगांरावर संकट निर्माण होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी वर्ष २००८-२००९ च्या तुलनेत बेरोजगारीचे प्रमाण कमी असेल, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-कोरोनाची आर्थिक झळ : इंडिगोकडून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.