ETV Bharat / business

टिकटॉकला पर्याय ठरू शकणारे यूट्यूबचे 'शॉर्टस' भारतात लाँच

व्हिडिओ अ‌ॅपच्या स्पर्धेत गुगल कंपनीने इतर कंपन्यांना टक्कर देणार आहे. विशेष म्हणजे हे अ‌ॅप भारतात पहिल्यांदा लाँच करण्यात आले आहे.

author img

By

Published : Sep 15, 2020, 4:20 PM IST

युट्यूब
युट्यूब

नवी दिल्ली - टिकटॉकवर देशात बंदी लागू झाल्यानंतर व्हिडिओ अ‌ॅ‌‌‌‌‌प कंपन्यांमध्ये चांगले पर्यायी अ‌ॅ‌‌‌‌‌प देण्यासाठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत थेट गुगल कंपनी उतरली आहे. गुगलने भारतात व्हिडिओ अ‌ॅ‌‌‌‌‌प शॉर्ट्स लाँच केले आहे.

  • YouTube Shorts beta is here - a new way to watch and create short, vertical videos. Discover them on the Shorts shelf on the YouTube app homepage. Ready to create? Soon, we will start rolling out new creation tools in the YouTube app.https://t.co/20KaFSDgJf pic.twitter.com/t5JvNvQv4C

    — YouTube India (@YouTubeIndia) September 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यूट्यूबने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले, की शॉर्टसमधून १५ सेकंद किंवा त्याहून कमी सेकंदाच्या व्हिडिओचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. क्रिएटर आणि कलावंत हे स्मार्टफोनचा वापर करून व्हिडिओ तयार करू शकतात. येत्या काही दिवसात आम्ही शॉर्टसचे बिटा व्हर्जन भारतात लाँच करणार आहोत. त्यामध्ये नवीन टेस्टिंगचे टूल क्रिएटरला मिळणार आहेत. हे सुरुवातीचे उत्पादन आहे. हे संपूर्ण जगासाठी येत्या काही महिन्यांत उपलब्ध करण्यात येणार आहे.

यूट्यूबकडून बिटा व्हर्जनमध्ये मल्टी सेगमेंट कॅमेरा, मल्टीपल व्हिडिओ क्लिप्स देण्यात येणार आहे. तसेच क्रियटरला म्युझिक लायब्ररीमधून विविध गाणी, संगीत निवडण्याचे अगणित पर्याच उपलब्ध होणार आहेत. येत्या काही महिन्यांत शॉर्टसमध्ये नवीन फीचर उपलब्ध होणार असल्याचे युट्यूबने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होत असल्याने टिकटॉकसह ५९ चिनी अ‌ॅ‌‌‌‌‌पवर २९ जूनला बंदी घातली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने स्वदेशी अ‌ॅ‌‌‌‌‌पच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामने रिल्स अ‌ॅ‌‌‌‌‌प लाँच केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.