बीजिंग - चीनची स्मार्टफोन कंपनी शिओमीने 'फोर्च्युअर ग्लोबल ५००' यादीत स्थान पटकावले आहे. या यादीत शिओमीचा ४६८ वा क्रमांक आल्याची कंपनीने सोमवारी घोषणा केली. कंपनीला फोर्च्युअन यादीत येण्यासाठी केवळ ९ वर्षे लागली आहेत. त्यामुळे फोर्च्युअर यादीमधील सर्वात तरुण कंपनी ठरली आहे.
शिओमी कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २.०४९.१० दशलक्ष डॉलर नफा कमविला आहे. तर कंपनी इंटरनेट सेवा आणि किरकोळ क्षेत्रात सातव्या क्रमांकावर आहे. हा अत्यंत मैलाचा दगड असल्याचे शिओमीचा संस्थापक आणि सीईओ लीई जून यांनी म्हटले आहे. सर्व वापरकर्ते आणि एमआयच्या चाहत्यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत.
शिओमी ही इंटरनेट कंपनी एप्रिल २०१० मध्ये स्थापन झाली आहे. या कंपनीने स्मार्ट हार्डवेअर हे इंटरनेट ऑफ थिंग्जला (आयओटी) जोडणारे उत्पादने बाजारात आणली आहेत. शिओमीने चीनच्या ५०० फोर्च्युअन यादीत पहिल्यांदाच जूनमध्ये ५३ व्या क्रमांकावर स्थान पटकाविले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ संधोधन संस्थेच्या (आयडीसी) माहितीनुसार शिओमी ही विक्रीच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. या कंपनीने मार्च २०१९ पर्यंत २०१८ च्या तुलनेत ३२.२ टक्के अधिक नफा मिळविला आहे.
शिओमीने २०० विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच कंपनीने इंटरनेट ऑफ थिंग्जसह कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता असलेला स्मार्टफोन विकसित करण्यासाठी १० अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे.