नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाचे शेअर १६ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एजीआरचे थकित शुल्क आणि इतर कारणांनी व्होडाफोन आयडियाचे पतमानांकन घसरले आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडियाचे शेअरचे घसरले आहेत.
मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात व्होडाफोन आयडियाचे शेअर १४.९१ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर २.९१ रुपये झाले आहेत. त्यानंतर ८.७७ टक्क्यांनी शेअर घसरून प्रति शेअर ३.१२ रुपये झाले आहेत. निफ्टीतही व्होडाफोन आयडियाचे शेअर १६.१७ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर २.८५ रुपये झाले आहेत.
हेही वाचा-व्होडाफोन-आयडियासह टाटा ग्रुपने भरले कोट्यवधींचे शुल्क; दूरसंचार विभाग 'मालामाल'
या कारणांनी व्होडाफोन आयडियाचे पतमानांकन खालावले-
केअर संस्थेने दीर्घकाळ देण्यात येणाऱ्या बँकिंग सुविधांसाठी व्होडाफोन आयडियाचे पतमानांकन कमी केल्याचे व्होडाफोन आयडियाने सोमवारी म्हटले आहे. व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्क भरण्याकरता मुदतवाढ मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कंपनीला सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे कंपनीची जोखीम वाढल्याने व्होडाफोन आयडियाचे पतमानांकन कमी करण्यात आले आहे. तसेच कंपनीला डिसेंबरअखेरच्या तिमाहीत मोठा तोटा सहन करावा लागला होता.
हेही वाचा-व्होडाफोन आयडिया एजीआरचे शुल्क भरणार; व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत व्यक्त केली चिंता
कंपनीने दूरसंचार विभागाला नियमाप्रमाणे एजीआरच्या थकित शुल्कातील २,५०० कोटी रुपये तातडीने दिले आहेत. कंपनीने १,००० कोटी रुपये शुक्रवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेलच्या शेअरमध्ये १.८२ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारती एअरटेलने दूरसंचार विभागाला थकित शुल्कापोटी १०,००० कोटी रुपये दिले आहे.