नवी दिल्ली – अनेक कर्मचारी घरातून काम करत असताना त्यांना जीमेल आणि जी सूट वापरताना आज अडचणीला सामोरे जावे लागले. त्याबाबत काही वापरकर्त्यांनी समाज माध्यमात पोस्ट करत गुगलच्या सेवेत त्रुटी असल्याचे म्हटले आहे.
जीमेलचे सर्व्हर डाऊन झाल्याने कोणतेही डॉक्युमेंट पाठवता येत नसल्याचे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. केवळ ब्लँक ईमेल जात असल्याचे वापरकर्त्याने म्हटले. दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, की मी वेगवेगळ्या अकांउट, नेटवर्क व डिव्हाईसवरून लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉग इन झाले नसल्याचे दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. अद्याप गुगलने सेवेत्रील त्रुटीबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
ऑनलाईन वेबसाईट बंद झाल्यास त्याची माहिती घेणाऱ्या एका वेबसाईटच्या माहितीनुसार जीमेल व जी सूट सेवांचा वापर करताना 62 टक्के लोकांना अॅटेचमेंटची समस्या जाणवली होती. तर 25 टक्के लोकांना लॉग इन करताना अडचण आली होती. जीमेलच्या 11 टक्के वापरकर्त्यांना संदेश मिळण्यात अडथळे आले आहेत.