ETV Bharat / business

ठरलं! टेस्लाची कार पुढील वर्षी भारताच्या बाजारपेठेत होणार दाखल

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांसाठी सीईओ एलॉन मस्क यांनी खुशखबर सांगितली आहे. यापूर्वी मस्क यांनी देशातील बाजारपेठेत कार आणण्यासाठी सरकारी नियमांची अडचण असल्याचे म्हटले होते.

एलॉन मस्क
एलॉन मस्क
author img

By

Published : Oct 2, 2020, 5:49 PM IST

नवी दिल्ली - टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारचे जगभरात अनेक चाहते आहेत. टेस्लाच्या भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

एलॉन यांना ट्विटरवरून वापरकर्त्याने भारतामध्ये कधी कार येणार, हा प्रश्न विचारला होता. त्यावर मस्क यांनी भारतामध्ये येण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे.

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. इडिया वाँटस टेस्ला आणि इंडिया लव्हज टेस्ला असे लिहिलेल्या टी शर्टचे ट्विट एका वापरकर्त्याने करत मस्क यांना भारतामधील नियोजनाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मस्क यांनी नक्कीच पुढील वर्षी असे उत्तर दिले आहे. प्रतीक्षा पाहत आहेत, त्याबाबत धन्यवाद, असेही टेस्लाचे सीईओ यांनी त्या वापरकर्त्याला म्हटले आहे.

हेही वाचा-टाळेबंदीत रद्द झालेल्या विमान तिकीटांचे प्रवाशांना 'असे' परत मिळणार पैसे

मस्क यांनी यापूर्वी भारतात इलेक्ट्रिक कार आणण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारच्या काही नियमांमुळे देशात कार आणण्यासाठी अडचणी असल्याचे मस्क यांनी २०१८मध्ये म्हटले होते. तसेच केंद्र सरकारच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमातील किचकट प्रक्रियेवरही त्यांनी टीका केली होती. चालू वर्षात जुलैमध्ये मस्क यांनी टेस्लाच्या भारतीय चाहत्यांसाठी इलेक्ट्रिक मॉडेल लवकरच उपलब्ध करू, असा विश्वास व्यक्त केला होता.

हेही वाचा-दिलासादायक! सप्टेंबरमध्ये निर्यातीत ५.२७ टक्क्यांची वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.