नवी दिल्ली - आयटी कंपनी टेक महिंद्राला पिंपरी चिंचवड महापालिकेचे ५०० कोटींचे कंत्राट मिळाले आहे. टेक महिंद्राला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम करण्यासाठी हे कंत्राट देण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या अंतर्गत प्रकल्पामधून टेक महिंद्रा १५ लाख नागरिकांशी महापालिका जोडण्यात येणार आहे. त्यामधून शाश्वत व स्मार्ट शहर तयार करण्याचा उद्देश आहे. टेक महिंद्राच्या 'टेकएननेक्स्ट स्ट्रॅटजी' या नव्या पिढीतील तंत्रज्ञानाचा ग्राहकांना अनुभव घेता येणार आहे. हे तंत्रज्ञान स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे टेक महिंद्राचे कॉर्पोरेट अफेअर्स प्रमुख सुजित बक्षी यांनी सांगितले.
हेही वाचा-मोबाईलवरील वस्तू व सेवा कर १,२०० रुपयापर्यंत कमी करावा; आयसीईएची मागणी
टेक महिंद्रा पायाभूत, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सेवरेज (मल्लनिसारण यंत्रणा), स्मार्ट ट्रॅफिक (वाहतूक), स्मार्ट पार्किंग, स्मार्ट पर्यावरण, सीसीटीव्ही देखरेख, डाटा सेंटर अशा सुविधा देणार आहे. प्रशासनाला माहिती व्यवस्थापन आणि माहिती प्रक्रिया करण्यासाठी कंपनी मदत करणार आहे. यापूर्वी टेक महिंद्राने कानपूर, गांधीनगर, नाशिक आणि जयपूरमध्ये स्मार्ट प्रकल्प राबविले आहेत.
हेही वाचा-सध्याच्या स्थितीत बँकांपुढे आव्हाने निर्माण होण्याची शक्यता - शक्तिकांत दास