नवी दिल्ली - टाटा मोटर्स कंपनी चालू महिन्यात बीएस-६ इंजिनक्षमतेची १०० हून अधिक मॉडेल वितरित करणार आहे. यामध्ये प्रवासी वाहनांचा समावेश आहे.
आगामी वाहन प्रदर्शनात टाटा मोटर्स चार मॉडेलचे लाँचिग करणार आहे. तर १५ व्यावसायिक मॉडेल तर १२ प्रवासी वाहने प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. जानेवारी २०२० नंतर १०० आघाडीच्या मॉडेलचे लाँचिंग करण्यात येणार आहे. ही माहिती टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राजेंद्र पेटकर यांनी दिली. वाढत्या महत्त्वाकांक्षा लक्षात घेवून कंपनीने उत्पादनांची रचना केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या किंमत
भविष्यातील हरित, शाश्वत, कार्यक्षम अशा मोबिलिटीच्या सुविधा प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे टाटा मोटर्सचे सीईओ गुएन्टर बुटशेक यांनी सांगितले.
हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात विकासदर ५ टक्के राहिल; जागतिक बँकेचा अंदाज
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून केवळ बीएस-६ इंजिनक्षमतेच्या वाहनांना विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांनी बीएस-६ इंजिनक्षमतेच्या वाहनांचे नवे मॉडेल लाँचिंग करण्यचा निर्णय घेतला आहे.