नवी दिल्ली - आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी स्पाईसजेटने खूशखबर दिली आहे. स्पाईसजेटकडून आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांपर्यंत विमान तिकिटात सवलत दिली जाणार आहे.
स्पाईसजेटच्या माहितीनुसार देशातील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकलमधील कर्मचाऱ्यांना विमान तिकिटावर 30 टक्क्यापर्यंत सवलत दिली जाणार आहे. ही सवलत 30 सप्टेंबरपर्यंत बुकिंग आणि प्रवास करताना उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा-चीनची हुवाई अमेरिकेच्या गुगलला देणार टक्कर; स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम लाँच
आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैध ओळखपत्राचा क्रमांक किंवा सरकारी संस्थेने दिलेला नोंदणी क्रमांक हा सवलत घेण्यासाठी द्यावा लागणार आहे. सरकारी संस्थांमध्ये भारतीय वैद्यकीय परिषद, राज्य वैद्यकीय परिषद किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा सरकारने मान्यता दिलेली आरोग्य संस्था यांचा समावेश आहे. सवलतीमधील विमान तिकीट बुकिंग करताना व चेक इन करताना ओळखपत्र आणि सरकारी फोटो ओळखपत्र लागणार आहे.
हेही वाचा-कोरोनातही रिलायन्सची घौडदौड : ओलांडला भांडवली मुल्यात 14 लाख कोटींचा टप्पा
स्पाईसजेटचा ओम लॉजिस्टिक्सबरोबर करार
कोरोना लसीच्या वापराकरता सरकारकडून लवकरच परवानगी मिळण्यापूर्वीच लस वाहतुकीकरता स्पाईसजेटने डिसेंबर 2020 मध्ये ओम लॉजिस्टिक्सबरोबर केला आहे. ओम लॉजिस्टिक्सच्या भागीदारीमागे वेगाने आणि अद्वितीय अशी कोरोना लसीची वाहतूक आणि डिलिव्हरी होणे हा उद्देश आहे. तसेच शीत साखळीचे देशात व आंतरराष्ट्रीयस्तरावर शाश्वत जाळे तयार करण्याचा उद्देश असल्याचे स्पाईसजेटने म्हटले आहे. गुरुग्राममधील स्पाईसएक्सप्रेस या विमान कंपनीने उणे ४० ते २५ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत तापमानात राहणाऱ्या औषध व लसीची वाहतूक करणारी सेवा सुरू केली आहे.