बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- ग्राहकांनी ३० जूनपर्यंत आधार क्रमांक हा पॅन क्रमांकला संलग्न करण्याची सूचना केली आहे. जर ग्राहकांनी आधार क्रमांक हा पॅनशी संलग्न केला नाही तर मिळणाऱ्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो, असे स्टेट बँकेने म्हटले आहे.
ग्राहकांनी गैरसोय टाळण्याकरिता पॅन क्रमांक हा आधारशी संलग्न करावा, असा सल्ला असल्याचे स्टेट बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे. हे बँकेच्या सेवा सुरळित होण्यासाठी आवश्यक असल्याचेही स्टेट बँकेने म्हटले आहे. पॅन हा आधारला संलग्न करणे बंधनकारक असल्याकडे स्टेट बँकेने लक्ष वेधले आहे.
हेही वाचा-नोटाबंदीच्या काळातील व्हिडिओ रेकॉर्ड नष्ट करू नका, आरबीआयचे बँकांना आदेश.
हा आहे पॅन आणि आधार क्रमांकमधील फरक-
पॅन हा दहा अंकी क्रमांक प्राप्तिकर विभागाकडून देण्यात येतो. तर आधार क्रमांक हा १२ अंकी क्रमांक युआयडीएआयकडून देण्यात येतो. आधार क्रमांक दिला जाताना नागरिक भारतीयच असल्याची पडताळणी करण्यात येते. पॅन क्रमांक हा बँक खाते काढणे, मुदत ठेवी काढणे अशा आर्थिक व्यवहारांसाठी बंधनकारक आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच; 'या' मिळणार सुविधा
प्राप्तिकर विभागाकडून आधार क्रमांक हा पॅन क्रमांकला संलग्न करण्याचा नेहमीच आग्रह केला जातो. दोन्ही कार्ड संलग्न केल्यास प्राप्तिकर विभागाला प्रशासकीय कार्यवाही करणे सोपे जाते.