ETV Bharat / business

योगगुरू रामदेव यांच्या किम्भो सोशल मेसिंजग अॅपचा का उडाला फज्जा, जाणून घ्या!

author img

By

Published : Jul 1, 2019, 1:23 PM IST

पतंजली आयुर्वेदकडून किम्भोमध्ये व्हाईस, व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ कॉन्फरिन्सिंग आणि एकत्रिकरणाच्या सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.

किम्भो सोशल मेसेंजिग अॅप

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपप्रमाणे किम्भो हे स्वदेशी सोशल मीडिया अॅप तयार करण्याचे योगगुरू रामदेव यांचे स्वप्न आहे. मात्र किम्भोचागतवर्षी शुभांरभ केल्यानंतर ते अॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आले. त्यामुळे किम्भोजाचा पुरता फज्जा उडाला होता. वापरकर्त्यांची गोपनीयता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पतंजली आयुर्वेदकडून किम्भोमध्ये व्हाईस, व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ कॉन्फरिन्सिंग आणि एकत्रिकरणाच्या सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते.

काय आहे किम्भो -
किम्भो म्हणजे 'तू कसा आहेस, अथवा काय नवीन' ? या संस्कृत शब्दावरून पतंजलीने सोशल मेसेजिंग अॅपचे नाव ठेवले होते. वापरकर्त्यांनी अॅप हे सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर गुगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवरून किम्भो काढून टाकण्यात आले होते. किम्भोची ऑगस्टमध्ये प्रायोगिक आवृत्ती पहायला मिळाली होती. त्यानंतर काही दिवसात अंतिम आवृत्ती उपलब्ध होईल, असे पतंजली आयुर्वेदने म्हटले होते. मात्र ते वापरकर्त्यांना ते पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.

पतंजली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिताभ सक्सेना यांनी किम्भो हे अॅप सध्यातरी थांबवून ठेवण्यात आल्याचे सांगितले. या अॅपबाबत काही असल्यास त्याची घोषणा बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण पत्रकार परिषदेत करतील, असे सक्सेना म्हणाले. किम्भो अॅपच्या भविष्यातील नियोजनाबाबत विचारले असता त्यांनी गोपनीय विषय असल्याचे सांगत उत्तर देणे टाळले.

यामुळे किम्भोचा उडाला होता फज्जा-
व्हॉट्सअॅपसारख्या सुविधा देणारे मेसेजिंग अॅप सुरू करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचे (आयटी) पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. देशातील आघाडीचे सोशल मीडियाचे तज्ज्ञ अनुप मिश्रा यांनी सोशल मेसिंजग अॅपसाठी कोणत्या गोष्टी लागतात याची माहिती दिली. ते म्हणाले, सोशल मीडियासाठी ओपन सोर्सची तज्ज्ञांचे पथक असायला हवे. तसेच क्लाऊड आणि कंटेन्ट डिलिव्हरी नेटवर्कचे तज्ज्ञ (सीडीएन), डाटा इंजिनिअर्स, मुख्य कामे करणारे डेव्हलपर, एपीआय डेव्हलपर आणि युझर इंटरफेस डेव्हलपर, टेस्टिंग यांचे पथक आवश्यक असते. त्याचबरोबर वापरकर्त्यांच्या डाटाला प्रोत्साहित करणारे (स्टिम्युलेशन) पथकाची आवश्यकता असते. व्यवस्थेमधील असणाऱ्या कमतरता (लूपहोल्स) शोधून काढणारी आऊटसोर्सिंग केलेल्या हॅकिंग पथकाची गरज असते. या सर्व गोष्टींचा किम्भोमध्ये अभाव होता, याकडे सक्सेना यांनी लक्ष वेधले.

किम्भोबाबत पतंजली आशावादी-

पतंजली आयुर्वेदचे राष्ट्रीय प्रवक्ता एस.के. तिजारवाला यांनी किम्भो अॅपच्या सद्यस्थितीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पतंजली आयुर्वेदकडून पूर्ण तयारीनिशी अॅपचा पुन्हा नव्याने शुभारंभ होणार का, याबाबत अधिक स्पष्ट होवू शकले नाही. असे असले तरी पतजंली आयुर्वेद हे अॅपबाबत आशावादी आहे. या अॅपचे काम बासनात गुंडाळल्याचे पतंजलीने फेटाळून लावले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.