ETV Bharat / business

नोकिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा; सांगितले 'हे' कारण

नोकियाच्या सीईओपदी नियुक्ती होणारे लुंडमार्क हे सध्या फिनलँडमधील आघाडीची उर्जा कंपनी फोर्टमचे अध्यक्ष व सीईओ आहेत. ते १ सप्टेंबरला नोकियाच्या सीईओपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता आहे.

Rajeev Suri
राजीव सुरी
author img

By

Published : Mar 2, 2020, 3:02 PM IST

नवी दिल्ली - एकेकाळी मोबाईलमध्ये आघाडीवर असलेल्या नोकिया कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ राजीव सुरी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे नोकिया सिमेन्स नेटवर्कचीही जबाबदारी होती. त्यांच्या जागी पेक्का लुंडमार्क हे जबाबदारी घेणार आहेत.

राजीव सुरी म्हणाले, नोकियामधील २५ वर्षानंतर मला काहीतरी वेगळे करायचे आहे. नोकिया हा नेहमीच माझा भाग होता. मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. नोकिया हे आणखी चांगले ठिकाण करण्यासाठी मी अनेक वर्ष प्रयत्न केली आहेत. त्यामधून मी एक चांगला नेता (लीडर) झालो आहे. नोकियाच्या सीईओपदी नियुक्ती होणारे लुंडमार्क हे सध्या फिनलँडमधील आघाडीची उर्जा कंपनी फोर्टमचे अध्यक्ष व सीईओ आहेत. ते १ सप्टेंबरला नोकियाच्या सीईओपदाची जबाबदारी घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५०० अंशांनी उसळी; आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी

अॅलकाटेल-ल्यूसेंटचा ताबा आणि ५ 'जी'चे जग आमच्यासमोर आहे. पेक्का यांनी नोकियामध्ये रुजू होण्याची तयारी दाखविल्याने मी आनंदित आहे, असे नोकियाच्या संचालक मंडळाचे चेअरमन रिस्टो सिलॅस्मा यांनी सांगितले. राजीव यांनी नोकियासाठी खूप योगदान दिले आहे. त्यांचे सर्व संचालकांकडून मी आभार मानतो. त्यांनी बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता या दोन्ही पद्धतीने काम केल्याचे रिस्टो यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.