ETV Bharat / business

नोटीसशिवाय राजीनामा देण्याची परवानगी द्या; एअर इंडियाच्या वैमानिकांची मागणी - Hardeep Singh Puri

भारतीय व्यवसायिक वैमानिक संघटनेत सुमारे ८०० वैमानिक आहेत. या संघटनेने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांना पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत.

Air India Pilot
एअर इंडिया वैमानिक
author img

By

Published : Dec 25, 2019, 5:01 PM IST

नवी दिल्ली - एअर इंडियाने पैसे थकविल्याने कंपनीच्या वैमानिक संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. वैमानिकांना नोटीसशिवाय कंपनी सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय व्यवसायिक वैमानिक संघटनेने (आयसीपीए) केली आहे.

एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी विकण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. विमान कंपनीचे भविष्य अनिश्चित असताना वैमानिक काम करण्याच्या स्थितीत नसल्याचे वैमानिक संघटनेने म्हटले आहे. वैमानिक संघटनेत सुमारे ८०० वैमानिक आहेत. या संघटनेने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांना पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत. बंद पडलेल्या इतर २१ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला समस्यांना सामोरे जाण्याची इच्छा नाही. देशातील वाढणाऱ्या बेरोजगारीत भर घालायची नाही, असे संघटनेने २३ डिसेंबरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-एअर इंडिया घेणार २ हजार ४०० कोटींचे कर्ज; सरकारकडून मागितली हमी

विमान उड्डाणाचे ऑक्टोबरमध्ये भत्ते मिळाले नसल्याचे पत्रात म्हटले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनिश्चिततेमध्ये राहत आहोत. त्याचा परिणाम म्हणून अनेक कर्मचाऱ्यांनी कर्ज थकविले आहे. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहावर आणि कुटुंबावर मोठा परिणाम होत असल्याचे वैमानिक संघनटेने हरदिप सिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सध्या, वैमानिकांना सहा महिन्यांची नोटीस देणे बंधनकारक आहे. तर एअर इंडियावर सुमारे ५८ हजार कोटींचे कर्ज आहे.

संबंधित वाचा-खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.