नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन दिवसीय संपाचा कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. बँकिंग संघटनेचे कर्मचारी ३१ जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.
संपामुळे बँकिंग कामकाज विस्कळित होवू नये, यासाठी बँकांकडून सर्व शाखा आणि कार्यालयात व्यवस्था करण्यात आल्याचे एसबीआयने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तरी काही प्रमाणात कामकाजावर परिणाम होणार असल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे. वेतनवाढीचा पुनर्आढावा घेण्याच्या मागणीकरिता बँक कर्मचारी संघटना ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या दोन दिवशी संपावर जाणार आहेत.
हेही वाचा-टाटा-मिस्त्री प्रकरण; एनसीएलएटीच्या त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!
या बँक कर्मचारी संघटना संपात होणार सहभागी-
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (युएफबीयू) संपात सहगागी होणार आहे. या संघटनेत महत्त्वाच्या ९ बँकिंग संघटना आहेत. या ९ बँकिंग संघटनामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑरगायनेझशन ऑफ बँक वर्कर्स अँड नॅशनल ऑरगायनेझशन ऑफ बँक ऑफिसर्स
हेही वाचा-जिओने दूरसंचार विभागाला एजीआरचे दिले १९५ कोटी रुपये!