सॅन फ्रान्सिस्को - तुम्ही जर मायक्रोसऑफ्टची जुनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण जुनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम ही सुरक्षित नसल्याचा मायक्रोसॉफ्टने इशारा दिला आहे. वापरकर्त्यांनी त्वरित विंडोज अपडेट करावे, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्टचे विडोंज एक्सपी आणि सर्व्हरवर २००३ ला सपोर्ट करणे कंपनीने यापूर्वीच बंद केले आहे. तरीही त्यासह विडोंज ७ मधून मालवेअरचा धोका होण्याची भीती आहे. २०१७ मध्ये ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वॅन्नाक्राय हा मालवेअर पसरला होता. त्याप्रमाणेच घडू शकते, अशी शक्यता मायक्रोसॉफ्टने व्यक्त केली आहे. विंडोज ८ आणि विंडोज १० ला मालवेअरचा धोका नसल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.