लंडन - भारतीय कंपनी ओलाने लंडनमध्ये आज अॅप लाँच केले आहे. या अॅपमध्ये २५ हजारांहून अधिक वाहन चालकांनी नोंदणी केली आहे.
बंगळुरुस्थित ओला कंपनी लंडनमधील प्रवाशांना सर्व प्रकारच्या वाहनांची सेवा देणार आहे. लंडनमध्ये व्यवसाय सुरू करणे हा मैलाचा दगड आहे. इंग्लंडमधील विविध शहरातील लोकांना जोडण्यासाठी आम्ही टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचे ओला इंटरनॅशनलचे सिमन स्मिथ यांनी म्हटले आहे. इंग्लंडमधील ओलाच्या प्रगतीची आम्हाला अभिमान आहे. लंडनमधील प्रवाशांना गुणवत्ता, सुरक्षितता आणि विश्वसनीयता देवून आम्ही यश मिळविणार आहोत.
हेही वाचा-गतवर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत जानेवारीत ८ टक्के घसरण
ओलाच्या वाहन चालकांना बाजारातील इतर कमिशनच्या तुलनेत सर्वाधिक कमिशन मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी लंडनच्या वाहतूक आणि स्थानिक यंत्रणेबरोबर भागीदारी करणार आहे. वाहन चालकांचे वाहन कौशल्य, ग्राहक सेवा आणि संवादासाठी कंपनीने ड्रायव्हटेक, मर्सर अँड पिअरसनबरोबर करार केला आहे.
हेही वाचा-कोरोनाचा भारतीय औषधी उद्योगावर परिणाम होण्याची भीती