वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्टने नफा चांगला कमविल्यानंतर कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांच्या वेतनात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ६६ टक्के वाढ केली. यामुळे त्यांना ४.२९ कोटी डॉलर म्हणजे सुमारे ३०९ कोटी रुपये वार्षिक वेतन मिळाले.
सत्या नाडेला यांना २३ लाख डॉलर वेतन आहे. त्यांना बहुतांश बक्षिस म्हणून मिळालेल्या शेअरमधून जास्त पैसे मिळत असल्याचे अमेरिकेच्या एका माध्यमाने म्हटले आहे. मिळालेल्या प्रोत्साहनात्मक शेअरमधून नाडेला यांची २.९६ कोटींची कमाई झाल्याचे मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा-ओयोचे ऑनलाईन पोर्टल लाँच; 'या' व्यवसायिकांना होणार फायदा
कंपनीच्या माहितीनुसार गेल्या वर्षी कंपनीने वित्तीय कामगिरीत आणखी एक विक्रम केला आहे. समभागधारकांसाठी कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखविल्याचे मायक्रोसॉफ्टच्या एका स्वतंत्र संचालकाने सांगितले. या संचालकाने कंपनीच्या यशाचे श्रेय हे नाडेला यांच्या रणनीतीपूर्ण नेतृत्व आणि ग्राहकांमधील विश्वास मजबूत करण्याच्या प्रयत्नाला दिले. तसेच त्यांच्या प्रयत्नातून कंपनीच्या संस्कृतीमधील बदल आणि तसेच नवीन तंत्रज्ञान आणि बाजारामधील प्रवेश आणि विस्तारातून यश मिळाल्याचे म्हटले आहे.
मूळचे हैदराबादमधील असणारे नाडेला हे २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांना आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २.५८ कोटी डॉलर एवढे वेतन मिळाले होते. नाडेला त्यांच्या नेतृत्वात कंपनीने क्लाउड कॉम्प्युटिंगच्या तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत मुसंडी मारली.
हेही वाचा-सलग ५ व्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक ४५३ अंशाने वधारून बंद; ब्रेक्झिट कराराचा परिणाम
अॅपलचे सीईओ टीम कुक यांना २०१८ मध्ये १.५७ कोटी डॉलर वेतन मिळाले. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना १९ लाख डॉलरचे वेतन मिळाले होते. त्यांच्या तुलनेत सत्या नाडेला यांचे वेतन अधिक आहे.