नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया आणि महिंद्रा आणि महिंद्राच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ झाली आहे. तर ह्युदांई आणि टोयोटाच्या वाहन विक्रीत घसरण झाली आहे.
गतवर्षी मारुती सुझुकीच्या १ लाख २१ हजार ४७९ वाहनांची विक्री झाली होती. चालू वर्षात डिसेंबरमध्ये १ लाख २४ हजार ३७५ वाहनांची विक्री झाली आहे. मारुतीच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये २.४ टक्के वाढ झाली आहे. महिंद्रा आणि महिंद्राच्या ३७ हजार ८१ वाहनांची डिसेंबरमध्ये विक्री झाली आहे. तर गतवर्षी ३६ हजार ६९० वाहनांची विक्री झाली होती. महिंद्राच्या वाहन विक्रीत १ टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा-अल्पबचत योजना : जानेवारी-मार्च तिमाहीत व्याज दर 'जैसे थे'
एम अँड एमचे विक्री आणि विपणन प्रमुख विजय राम नक्र म्हणाले, नव्या वर्षात बीएस-४ वाहनांच्या उत्पादनासाठी संपूर्णपणे सज्ज आहोत. ह्युदांईच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ९.८ टक्क्यांची घसरण झाली आहे. चालू वर्षात डिसेंबरमध्ये ३७ हजार ९५३ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ४२ हजार ०९३ वाहनांची विक्री झाली होती. ह्युदांईच्या वाहन विक्रीत ९.८ टक्के घसरण झाली आहे.
हेही वाचा-विजय मल्ल्याला दणका; विशेष न्यायालयाने बँकांना 'ही' दिली परवानगी
एचएमआयएलचे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले, वर्ष २०१९ हे भारतीय वाहन उद्योगासाठी आव्हानात्मक होते. अशा प्रतिकूल स्थितीतही ह्युंदाईने विविध श्रेणीत चार उत्पादने लाँच केली आहेत. टोयोटा किर्लोस्करच्या वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ४५ टक्के घसरण झाली आहे.