नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाला मंदीचा फटका बसला आहे. मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये २४.४ टक्क्यांची घसरण झाली आहे.
मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांची सप्टेंबरमध्ये १ लाख २२ हजार ६४० वाहनांची विक्री झाली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १ लाख ६२ हजार २९० वाहनांची विक्री झाली होती. मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत देशात २६.७ टक्के घसरण झाली. सप्टेंबरमध्ये १ लाख १२ हजार ५०० वाहनांची विक्री झाली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १ लाख ५३ हजार ५५० वाहनांची विक्री झाली होती.
हेही वाचा-शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी पडझड; बँकेसह वित्तीय कंपन्यांच्या शेअरची आपटी
अल्टो आणि वॅगन अशा मिनी कारच्या विक्रीत ४२.६ टक्के घसरण झाली आहे. चालू वर्षाच्या सप्टेंबरमध्ये मिनी कारची २० हजार ८५ तर गतवर्षी ३४ हजार ९७१ वाहनांची विक्री झाली. स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बेलेनो आणि डिझायरच्या विक्रीत २२.७ टक्के घसरण झाली. या वाहनांची सप्टेंबरमध्ये एकूण ७४ हजार ११ एवढी विक्री झाली होती.
हेही वाचा-'यंत्रणेतील लोकांनी टीका सहन करायला पाहिजे'
चालू वर्षात सप्टेंबरमध्ये ५७ हजार १७९ वाहनांची विक्री झाली आहे. याशिवाय सेडान सिआझच्या विक्रीतही घसरण झाली आहे. वितारा ब्रेझ्झा, एस-क्रॉस आणि इरटिगाच्या वाहन विक्रीत किंचित घट झाली आहे. मारुती सुझुकीच्या वाहनांची विदेशात निर्यात होते. या निर्यातीतही १७.८ टक्के घसरण झाली आहे.
हेही वाचा-महिंद्रा आणि महिंद्राच्या एकूण वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये २१ टक्क्यांची घसरण