मुंबई - वाहन उद्योगातील मंदीचे 'ग्रहण' कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणाऱ्या कंपनीने सलग आठव्या महिन्यात उत्पादन घटविले आहे. चालू वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात मारुती सुझुकीच्या १ लाख १९ हजार ३३७ वाहनांची विक्री झाली. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये १ लाख ५० हजार ४९७ वाहनांची विक्री झाली होती.
गतवर्षी मारुती सुझुकीच्या १ लाख ४८ हजार ३१८ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. यंदा वाहन विक्रीचे प्रमाण कमी होवून १ लाख १७ हजार ३८२ वाहनांची विक्री झाली आहे. तर व्हॅनचे उत्पादन गेल्या महिन्यात सुमारे ५० टक्क्यांनी घटले आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये १३ हजार ८१७ व्हॅनची तर यंदा ७ हजार ६६१ व्हॅनची विक्री झाली आहे.
हेही वाचा-रेरा बाह्य गृहप्रकल्पांचाही 'त्या' योजनेत समावेश करावा- एफपीसीईची पंतप्रधानांना विनंती
गेल्या वर्षी मध्यम प्रकारामधील वाहनांचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये हे ३४ हजार २९५ एवढे होते. तर चालू वर्षातील ऑक्टोबरमध्ये २० हजार ९८५ वाहनांचे उत्पादन झाले आहे. यामध्ये एस-प्रेस्सो, अल्टो, जुनी वॅगनॉर आर या वाहनांचा समावेश आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये नवी वॅगनॉरआर, स्विफ्ट अशा वाहनांचा समावेश आहे. कंपनीच्या जिप्सी, वितारा ब्रेझ्झा, एरटिगा, एक्सएल-६, एस-क्रॉस या वाहनांच्या विक्रीत किंचित वाढ झाली आहे. गतवर्षी या वाहनांची २२ हजार ५२६ वाहनांची विक्री झाली होती. यंदा या २२ हजार ७३६ वाहनांची विक्री झाली आहे.
हेही वाचा-जम्मू आणि काश्मीरमधून १०.७८ लाख मेट्रिक टन सफरचंदाची वाहतूक
सणादरम्यान मागणी झाल्याने वाहन विक्रीत सुधारणा झाली आहे. देशातील बाजारपेठेत मारुतीने ऑक्टोबर २०१९ मध्ये १ लाख ४४ हजार २७७ वाहनांची विक्री केली आहे. ही विक्री गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ४.५ टक्क्यांहून अधिक आहे.