ETV Bharat / business

सौदी अरेबिया जिओमध्ये घेणार 1.5 अब्ज डॉलर किमतीचा हिस्सा - Investment in Reliance Jio

नवी दिल्ली – सौदी अरेबिया सरकारची मालकी असलेला सार्वभौम संपत्ती निधीची (पीआयएफ) जिओमध्ये 25 टक्के गुंतवणूक करणार आहे. ही माहिती अरब राष्ट्राच्या एका माध्यमाने दिली आहे. सौदी अरेबियाच्या पीआयएफकडून रिलायन्स जिओमध्ये 1.5 अब्ज डॉलर किमतीचा 2.33 टक्के हिस्सा घेणार आहे. या हिस्सा खरेदीनंतर पीआयएफ हा जिओच्या संचालक मंडळावर येणार आहे. त्यासाठी रिलायन्सकडून 25 टक्के हिश्श्याची पीआयएफला विक्री करण्यात येणार आहे. नुकतेच जिओमध्ये अबुधाबीमधील मुबादाला कंपनीने 1.2 अब्ज डॉलरचा हिस्सा आणि एडीआयएने 750 दशलक्ष डॉलरचा हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरातील आठ कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये फेसबुक, केकेआर आणि सिल्व्हर लक कॅपिटल या कंपन्यांचा समावेश आहे.

मुकेश अंबानी व सौदी अरेबियाचे गुंतवणूकदार

author img

By

Published : Jun 16, 2020, 2:14 PM IST

नवी दिल्ली – टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटातही रिलायन्स जिओची गुंतवणुकीत यशस्वी घौडदौड सुरू आहे. सौदी अरेबियाची मालकी असलेला सार्वभौम संपत्ती निधी (पीआयएफ) ही संस्था जिओमध्ये 25 टक्के गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे. पीआयएफ रिलायन्स जिओमध्ये 1.5 अब्ज डॉलर किमतीचा 2.33 टक्के हिस्सा घेणार आहे.

रिलायन्समधील हिस्सा खरेदीनंतर जिओच्या संचालक मंडळावर पीआयएफ येणार आहे. त्यासाठी रिलायन्सकडून 25 टक्के हिश्श्याची पीआयएफला विक्री करण्यात येणार आहे. नुकतेच जिओमध्ये अबुधाबीमधील मुबादाला कंपनीने 1.2 अब्ज डॉलरचा हिस्सा आणि एडीआयएने 750 दशलक्ष डॉलरचा हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरातील आठ कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये फेसबुक, केकेआर आणि सिल्व्हर लक कॅपिटल या कंपन्यांचा समावेश आहे.

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. या कंपनीचे 388 लाख ग्राहक आहेत. कंपनीने 2016 मध्ये मोफत कॉलिंग व स्वस्तात डाटा उपलब्ध करून दिल्यानंतर स्पर्धक कंपन्यांच्या व्यवसायात कमालीची घसरण होत गेली आहे.

असे आहेत रिलायन्स जिओचे सौदे

  • फेसबुकने 9.99 टक्के घेतलेला हिस्सा - 43,573.62 कोटी रुपये
  • 8 जागतिक कंपन्यांना 12.37 टक्के हिश्श्यांची विक्री- 60,800 कोटी रुपये
  • राईट्स इश्श्यूमधून रिलायन्स इंडस्ट्रीजला 53 हजार 124 कोटी रुपये मिळणार आहेत.
  • टॉलर इन्व्हआयटी आणि जेव्हीचा हिस्सा विकल्याने 70 हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.