ETV Bharat / business

जिओ ठरला जगातील सर्वात पाचवा मजबूत ब्रँड!

ब्रँड फायनान्स ही जगभरातील कंपन्यांच्या ब्रँडचे मूल्यांकन सर्वात आघाडीची कन्सल्टन्सी संस्था आहे. या संस्थेने 'ब्रँड फायनान्स ग्लोबल ५००' या जगातील सर्वाधिक मजबूत ब्रँडची यादी जाहीर केली आहे.

जिओ
जिओ
author img

By

Published : Jan 28, 2021, 6:47 PM IST

नवी दिल्ली- अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ ही जगातील सर्वात पाचवा मजबूत ब्रँड ठरली आहे. जिओपूर्वी फेरारी आणि कोका-कोला या कंपन्यांचा ब्रँडमध्ये वरचा क्रमांक आहे.

ब्रँड फायनान्स ही जगभरातील कंपन्यांच्या ब्रँडचे मूल्यांकन सर्वात आघाडीची कन्सल्टन्सी संस्था आहे. या संस्थेने 'ब्रँड फायनान्स ग्लोबल ५००' या जगातील सर्वाधिक मजबूत ब्रँडची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वूईचॅट सर्वात आघाडीवर असल्याचे वार्षिक अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा- 'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विचार करत अर्थसंकल्प सादर व्हावा'

काय म्हटले आहे मानांकन यादीत?

  • जरी २०१६ मध्ये जिओची स्थापना झाली असली तरी कंपनी ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे.
  • जगात तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीचे ४० कोटी ग्राहक आहेत. जिओने बाजारपेठेत प्रवेश करता मोफत व्हाईस कॉलिंग आणि स्वस्तामध्ये डाटा प्लॅन जाहीर केले होते.
  • विश्वसनीय परवडणारे दर, आकर्षित करणारे ४जीचे प्लॅन यामुळे भारतामधील इंटरनेट बाजारपेठे जिओमुळे बदलल्याचे ब्रँड फायनान्सने म्हटले आहे.
  • कंपनीने ३० देशांमध्ये विविध २० क्षेत्रांवर ५० हजार जणांच्या प्रतिक्रिया घेऊन ही यादी जाहीर केली आहे.

अहवालानुसार वूईचॅट हे चीनचे मोबाईल अ‌ॅ‌‌‌‌‌प हा सर्वात मजबूत ब्रँड ठरला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रशियाची बँक स्बेर आणि चौथ्या क्रमांकावर कोका कोला आहे. जिओमध्ये इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे कमकुवत स्थाने नाहीत. दरम्यान, २०२१ च्या मानांकनानुसार गुगल आणि अमेझॉननंतर लोक अपलचे सर्वाधिक अनुसरण करतात.

हेही वाचा-सर्वसामान्य जनतेचा अर्थसंकल्पामध्ये विचार व्हावा; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मागणी

रिलायन्स जिओने मिळविले नवे ७.३ दशलक्ष ग्राहक -

रिलायन्स जिओचे सप्टेंबर २०२० मध्ये ४०५.६ दशलक्ष ग्राहक होते. पहिल्यांदाच चीनच्या बाहेर एखाद्या टेलकॉम ऑपरेटर कंपनीला ४०० दशलक्ष मिळविणे शक्य झाले आहे. कोरोना महामारीत आव्हाने असतानाही रिलायन्सला चांगली आर्थिक कामगिरी करणे शक्य झाले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत रिलायन्स जिओने ७.३ दशलक्ष ग्राहक नव्याने मिळविले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.