नवी दिल्ली - इक्रा या पतमानांकन संस्थेच्या संचालक मंडळाने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यस्थापकीय संचालक नरेश टक्कर यांना पदावरून हटविले आहे. त्यांचे नाव आयएल अँड एफएसच्या घोटाळ्यामध्ये नाव आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
इक्राच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये कंपनी व समभागधारकांच्या हितासाठी नरेश टक्कर यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती इक्राने शेअर बाजाराला दिली आहे. इक्राकडून नव्या सीईओचा शोध सुरू आहे.
हेही वाचा-काय आहे कोहिनूरशी आयएल अँड एफएसचे कनेक्शन ?, 'या' घोटाळ्यांमुळे आहे वादाच्या भोवऱ्यात
कर्जबाजारी असलेल्या आयएल अँड एफएसला चांगले पतमानांकन दिल्याप्रकरणी सेबीने टक्कर यांची चौकशी केली. त्यानंतर जुलैमध्ये इक्राने टक्कर यांनी जुलैमध्ये सक्तीच्या रजेवर पाठविले होते. यापूर्वी टक्कर यांना जुलैमध्ये कंपनीने सक्तीच्या सुट्टीवर पाठविले होते.
हेही वाचा- आयएल अँड एफएसच्या लेखा परीक्षण कंपन्यांवर होणार कारवाई, एनसीएलटीचा सरकारला हिरवा कंदील
विपुल अग्रवाल यांची अंतरिम सीओओ म्हणून १ जुलै २०१९ पासून नियुक्ती करण्यात आली आहे. पतमानांकनची प्रक्रिया स्वायत्त आणि प्रामाणिक ठेवण्यासाठी बांधील राहू, असे इक्राने म्हटले आहे.
हेही वाचा-आयएल अँड एफएसच्या ४ माजी संचालकांच्या कार्यालयासह घरात ईडीची झडती