ETV Bharat / business

ह्युंदाई अलकाजार एसयूव्हीची बुकिंग आजपासून सुरू - SUV Creta

प्रीमियम एसयूव्ही अलकाजार  ही 6 ते 7 सीटमध्ये उपलब्ध होणार आहे. या कारची बुकिंग ही कंपनीच्या डीलरशिपमधून किंवा ऑनलाईन 25,000 पैसे भरून करता येणार आहे.

Hyundai Alcazar
ह्युंदाई अलकाजार
author img

By

Published : Jun 9, 2021, 3:48 PM IST

नवी दिल्ली - ह्युंदाई मोटर इंडियाने (एचएमआयएल) एसयूव्ही अलकाजार या नव्या कारसाठी बुकिंग सुरू केली आहे. ही कार चालू महिन्यात बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

प्रीमियम एसयूव्ही अलकाजार ही 6 ते 7 सीटमध्ये उपलब्ध होणार आहे. या कारची बुकिंग ही कंपनीच्या डीलरशिपमधून किंवा ऑनलाईन 25,000 पैसे भरून करता येणार आहे.

हेही वाचा-नोटाबंदीच्या काळातील व्हिडिओ रेकॉर्ड नष्ट करू नका, आरबीआयचे बँकांना आदेश

अलकाजार हे 2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेलमध्ये उपलब्ध आहेत. एचएमआयएचे संचालक (विक्री, मार्केटिंग आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले, की ह्युंदाई मोटर इंडिया ही एसयूव्हीची सर्वाधिक विक्री करणारी वाहन कंपनी ठरली आहे. कंपनीकडून एसयूव्हीमध्ये क्रेटा, व्हेन्यू, टस्कॉन आणि कोना इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्यात येते.

हेही वाचा-मोफत लसीकरणासह धान्यवाटपाकरिता केंद्राला करावा लागणार १.४५ लाख कोटींचा खर्च

ग्राहकांना मिळणार अद्वितीय अनुभव

आम्हाला ह्युंदाई अलकाजारसाठी बुकिंग सुरू केल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. आमची प्रीमियम 6 ते 7 आसनी एसयूव्ही ही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या कारमधून ग्राहकांना दर्जेदार वेळ, एकत्रित प्रवासाचा योग, संस्मरणीय क्षण आणि आनंदणाचे अनुभव मिळू शकणार आहेत.

महिंद्रा आणि टाटाशी स्पर्धा करणार मॉडेल

अलकाजार ही महिंद्राच्या एक्ययूव्ही ५००, टाटा सफारी आणि एमजी हेक्टर प्लसशी स्पर्धा करणार आहे. कंपनीकडून एसयूव्ही श्रेणीत बळकट स्थान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ह्युंदाई मोटरचे मॉडेल मीड-साईज्ड एसयूव्ही क्रेटा आणि प्रिमीयम टस्कॉन हे लोकप्रिय आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.