ETV Bharat / business

ह्युदांई मोटर इंडियाकडून कोरोनाच्या संकटात २० कोटी रुपयांची मदत जाहीर - Hyundai Motor India announces 20 crore relief package

ह्युंदाई मोटरचे संचालक आणि सीईओ एस. एस. किम म्हणाले, की कोरोनाच्या संकटामुळे देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी राज्य व शहरांना अर्थपूर्ण मदत करण्यासाठी ह्युंदाईने संसाधने वापरण्यास सुरुवात केली आहे.

ह्युदांई मोटर
ह्युदांई मोटर
author img

By

Published : Apr 28, 2021, 9:27 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटात ह्युंदाई मोटर इंडियाने 20 कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे. हा निधी कोरानाच्या मोठ्या संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, तेलंगाणा आणि तामिळनाडू राज्यांसाठी वापरला जाणार आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाकडून आर्थिक मदतीशिवाय वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना अतिरिक्त कर्मचारी पुरविण्यासाठी गरज भासल्यास मदत केली जाणार आहे. ह्युंदाई मोटरचे संचालक आणि सीईओ एस. एस. किम म्हणाले, की कोरोनाच्या संकटामुळे देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी राज्य व शहरांना अर्थपूर्ण मदत करण्यासाठी ह्युंदाईने संसाधने वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच मदत करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. अशा कठीण प्रसंगात आपण पुष्कळदा आशा हरवून बसतो. मात्र, अशावेळी सर्वात्कृष्ट माणुसकी दाखविण्याचा काळ असतो, असेही ह्युंदाई मोटरचे संचालकांनी म्हटले आहे.

हेही वाचा-Special : वर्षभरात कोरोनाबाधित गर्भवती महिलांचे ९९ टक्के शिशु कोरोनामुक्त

सरकारला मदत सुरूच ठेवण्यात येईल-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना मदत करण्यासाठी विशेष पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे ह्युंदाई मोटरने म्हटले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्य व शहरांना वेळेवर मदत करण्याची आम्ही खात्री देत आहोत. कंपनीकडून सर्व पर्यायांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. कंपनीने तामिळनाडूमधील श्रीपेंदुबरम प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षांहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांसाचे लसीकरण केले आहे. कंपनीकडून महामारीवर मात करण्यासाठी सरकारला मदत सुरूच ठेवण्यात येईल, असेही ह्युंदाई मोटरचे संचालक आणि सीईओ एस. एस. किम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.