ETV Bharat / business

गुगल भारतामधील लघू उद्योगांना १०९ कोटींची करणार मदत - Google latest news

गुगलने अमेरिकेबाहेरील लघू उद्योगांसाठी ७५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्धता दाखविली. गुगलकडून देशातील लघू आणि सूक्ष्म उद्योगांना १५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सुंदर पिचाई
सुंदर पिचाई
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:16 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात लघू आणि सूक्ष्म उद्योगांना मदतीचा हात देण्यासाठी गुगल कंपनी पुन्हा पुढे आली आहे. गुगलने देशातील सूक्ष्म आणि लघू उद्योगांना १५ दशलक्ष डॉलरची (१०९ कोटी रुपये) मदत करण्याचे आज जाहीर केले आहे.

गुगलने अमेरिकेबाहेरील लघू उद्योगांसाठी ७५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्धता दाखविली. गुगलकडून देशातील लघू आणि सूक्ष्म उद्योगांना १५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक भागीदारांबरोबर चर्चा सुरू आहे. कंपनीही बिगर सरकारी भागीदारांसोबत चर्चा करत आहे.

हेही वाचा-कोरोनाचा पर्यटनासह आदरातिथ्य क्षेत्राला सर्वाधिक फटका

काय म्हटले आहे गुगलने?

  • गुगलचे जगभरातील लघू उद्योगांबरोबर खास नाते आहे. त्यांना नवीन ग्राहकापर्यंत पोहोचविणे आणि विस्तार करणे आदींसाठी गुगल मदत करत आहे.
  • भविष्याची अधिक बळकट बांधणी करण्यासाठी आणि नवीन आव्हान स्वीकारण्यासाठी भांडवलाची गरज आहे. अशा काळात आम्ही मदत करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे गुगलने म्हटले आहे.

दरम्यान, गतवर्षी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतामध्ये सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. हा निधी येत्या सात वर्षात भारतामधील डिजीटल सेवांसाठी वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा-नवपदवीधरांना नोकऱ्या देण्याकरता कॉर्पोरेट कंपन्या उत्सुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.