ETV Bharat / business

'टिकटॉक विकत घेण्याच्या शर्यतीत गुगल नाही' - Latest tiktok news

सुंदर पिचाई म्हणाले, की मोठ्या कंपन्या चांगल्या काम करत आहेत. पण, अनेक कंपन्या वेगाने वाढणार आहेत. पूर्वीपेक्षा आपल्याकडे माहितीचे अनेक पर्याय आहेत. अजून अनेक पर्याय आपल्यासमोर येणार आहेत.

सुंदर पिचाई
सुंदर पिचाई
author img

By

Published : Aug 27, 2020, 1:18 PM IST

सॅनफ्रान्सिस्को - अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी चीनची कंपनी टिकटॉक विकत घेण्याच्या स्पर्धेत गुगल नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते एका पॉडकॉस्टच्या कार्यक्रमात बोलत होते. टिकटॉक ही कंपनी महामारीतही वेगाने वाढत असल्याचेही पिचाई यावेळी म्हणाले.

पॉडकॉस्टच्या कार्यक्रमात न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्राध्यापक स्कॉट गॅलोवे यांनी टिकटॉक विकत घेण्यासाठी गुगल इच्छुक आहे का, असा प्रश्न सुंदर पिचाई यांना विचारला आहे. त्यावर पिचाई यांनी टिकटॉकसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, की टिकटॉकची मालकी असलेली बाईटडान्स गुगल क्लाउडची सर्व्हिस घेत आहे.

सुंदर पिचाई म्हणाले, की मोठ्या कंपन्या चांगल्या काम करत आहेत. पण, अनेक कंपन्या वेगाने वाढणार आहेत. तुम्हाला माहित आहे. तुम्ही संशोधनासाठी चिंतेत आहात. तुम्ही नवीन तंत्रज्ञानासाठी चिंतेत आहात. तुम्ही नव्या पिढीसाठी चिंतेत आहेत. अशा स्थितीत पूर्वीपेक्षा आपल्याकडे माहितीचे अनेक पर्याय आहेत. अजून अनेक पर्याय आपल्यासमोर येणार आहेत.

टिकटॉक सापडली अडचणीत!

टिकटॉकचे अमेरिकेत १०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षांच्या कार्यकारी अधिकारांचा वापर करून ६ ऑगस्टला बाईटडान्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात टिकटॉकने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी १४ ऑगस्टला कार्यकारी आदेश काढून बाईटडान्सला अमेरिकेतील गुंतवणूक काढण्याचा ९० दिवसांची मुदत घालून पर्याय दिला आहे. अमेरिकेच्या सुरक्षेला धोका असल्याचा आरोप टिकटॉकने न्यायालयात केलेल्या दाव्यात फेटाळला आहे. टिकटॉक विकत घेण्यासाठी मायक्रोसॉफ्ट व ट्विटर या कंपन्या उत्सुक आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.