ETV Bharat / business

कोरोनाने नोकऱ्यांना 'ग्रहण'; रिनॉल्ट कंपनीकडून १५ हजार कर्मचारी कपात - रिनॉल्ट कंपनी न्यूज

फ्रान्समधील ४ हजार ६०० नोकऱ्यांमध्ये कपात होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर इतर देशांमधील १० हजारांहून अधिक नोकऱ्या कमी होणार आहेत.

रिनॉल्ट
रिनॉल्ट
author img

By

Published : May 29, 2020, 2:40 PM IST

पॅरिस - कोरोनाने उद्योगातील नोकऱ्यांवर ग्रहण लागले आहे. फ्रान्सच्या रिनॉल्ट कंपनीने सुमारे १५ हजारहून अधिक कर्मचारी नोकरीवरून काढण्याची घोषणा केली. येत्या तीन वर्षात २ अब्ज युरोचा खर्च कमी करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

फ्रान्समधील ४ हजार ६०० नोकऱ्यांमध्ये कपात होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर इतर देशांमधील १० हजारांहून अधिक नोकऱ्या कमी होणार आहेत. कंपनीकडून वाहनांची उत्पादन क्षमताही कमी करण्यात येत आहे. वर्ष २०१९ मध्ये ४० लाख वाहनांची उत्पादन क्षमता ही २०२४ पर्यंत ३३ लाख करण्यात येणार आहे.

हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये अॅमेझॉनकडून सुखद धक्का.. सव्वा लाख हंगामी कर्मचाऱ्यांना 'ही' दिली ऑफर

कोरोनाच्या संकटाने वाहन उद्योगावर मोठे संकट आहे. त्यामुळे कंपनीने बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे रिनॉल्ट कंपनीने म्हटले आहे. कंपनीत जगभरात १ लाख ८० हजार कर्मचारी काम करत आहेत. चीनमधील कारचे सर्व उत्पादन थांबविण्याचा रिनॉल्टने निर्णय घेतला आहे. या कंपनीत फ्रान्स सरकारचा १५ टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा-'या' कारणामुळे भारतातून आयात होणाऱ्या डुक्कराच्या मांसावर चीनमध्ये बंदी

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील व्यवहार आणि नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध आले आहेत. सर्वच उद्योगांना फटका बसत असल्याने अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.