नवी दिल्ली - फोर्ड इंडियाने २२ हजार ६९० प्रिमीअम एसयूव्ही इंडेव्हर परत घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या वाहनामध्ये असलेल्या एअरबॅग इनफ्लेटरमध्ये दोष आहे की नाही, याची कंपनी तपासणी करणार आहे.
सर्व वाहनामधील बॅटरी मॉनिटरिंग सिस्टिमच्या (बीएमएस) वायरिंगची कंपनीकडून तपासणी करण्यात येत आहे. ही वाहने गुजरातमधील सदानंद येथील प्रकल्पात २०१७ सप्टेंबर ते एप्रिल २०१९ मध्ये उत्पादित करण्यात आली आहेत.
एअरबॅग इनफ्लॅटरची तपासणी करण्याचा निर्णय स्वयंसेवीरीतीने घेतल्याचे फोर्ड इंडियाने म्हटले आहे. ही वाहने कंपनीमधील चेन्नई येथील प्रकल्पात फेब्रुवारी २००४ ते सप्टेंबर २००४ मध्ये उत्पादित करण्यात आली आहेत. याबाबतची प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक माहिती दिली जाणार आहे. तसेच ते वाहन फोर्ड वितरकाकडे तपासणीसाठी आणण्याची विनंती करण्यात येणार आहे. ही स्वयंसेवी पद्धतीने करण्यात आलेली तपासणी ग्राहकांना सेवा देण्याच्या बांधिलकीचा भाग आहे. यामुळे ग्राहकांना वाहनाबाबत दीर्घकाळ पूर्णपणे चिंतामुक्त राहणे शक्य असल्याचे फोर्ड इंडियाने म्हटले आहे.