बंगळुरू - फ्लिपकार्टने रिटेल स्टोअर विशाल मेगा मार्टबरोबर भागीदारी केले आहे. या भागीदारीतून २६ शहरामधील ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत. त्यासाठी फ्लिपकार्टवर विशाल मेगा मार्टचा पर्याय देण्यात आला आहे.
ग्राहकांना आटा, तांदूळ, तेल, डाळी इत्यादी जीवनावश्यक वस्तू मागविता येणार आहेत. कंटेन्टमेंट क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी ग्राहकांना घरपोच वस्तू दिल्या जाणार आहेत. फ्लिपकार्टवरून ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना विशाल मार्टमधून घरपोच वस्तू दिल्या जाणार आहेत.
हेही वाचा-खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची वाढणार चिंता; गृह मंत्रालयाने 'तो' आदेश घेतला मागे
येत्या आठवड्यात ही सेवा देशातील २४० शहरात देण्यात येणार असल्याचे फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ कल्याण कृष्णमुर्ती यांनी सांगितले.
हेही वाचा - नाबार्डकडून सहकारी बँकांसह प्रादेशिक ग्रामीण बँकांना २०,५०० कोटींचे वाटप-
दरम्यान, डी मार्ट या रिटेल स्टोअरनेही घरपोच वस्तू देण्यास सुरुवात केली आहे.