सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकने 1 हजार 196 अकाऊंटस, इन्स्टाग्रामवरून 994 दुर्भावनायुक्त अकाऊंटस तसेच, 7 हजार 947 बनावट पेज आणि 110 ग्रुप्स काढून टाकले आहेत.
ऑक्टोबरमध्ये फेसबुकने अकाऊंटस, पेज आणि ग्रुप्सची 14 नेटवर्क काढून टाकली. त्यापैकी आठ जॉर्जिया, म्यानमार, युक्रेन आणि अझरबैजानमधील होती. त्यांनी आपल्या देशातील घरातील प्रेक्षकांना लक्ष्य केले होते. याशिवाय, इराण, इजिप्त, अमेरिका आणि मेक्सिको येथून असे सहा ग्रुप्स नेटवर्कवरून हटवले. त्यांनी आपल्या देशांबाहेरील लोकांवर लक्ष्य केले होते.
म्यानमारमध्ये 36 फेसबुक अकाऊंटस, सहा पेज, दोन ग्रुप आणि पीआर एजन्सी ओपनमाईंडशी जोडलेले एक इन्स्टाग्राम खाते कंपनीने काढून टाकले.
म्यानमारमध्ये नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या तपासणीत या प्रदेशातील संशयित समन्वित इनऑथेन्टिक बिहेवियरमध्ये ही नेटवर्क सापडल्याचे फेसबुकने निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - 'शेअर बाजार येत्या काही आठवड्यांत गाठणार विक्रमी निर्देशांकाचा टप्पा'
फेसबुक नेटवर्कने म्यानमारमधील लोकांद्वारे चालवलेली 10 फेसबुक अकाऊंटस, 8 पेजेस, 2 ग्रुप आणि 2 इंस्टाग्राम अकाऊंटसदेखील काढून टाकली. हे घरगुती प्रेक्षकांवर केंद्रित होते.
अमेरिकेत, फेसबुकने 202 फेसबुक अकाऊंटस, 54 पेजेस आणि 76 इन्स्टाग्राम अकाऊंटस काढून टाकली. ही अकाऊंटस रॅली फोर्ज या अमेरिकन मार्केटींग कंपनीशी जोडलेली होती आणि टर्निंग पॉईंट यूएसए आणि इन्कॉलिव्ह कंझर्वेशन ग्रुपच्या वतीने कार्यरत होती.
'आम्ही गैरवापर रोखण्यासाठी काम करत आहोत. परंतु, आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, हा एक सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. आम्ही पुढेही सुधारणा करत राहण्यासाठी वचनबद्ध आहोत,' असे फेसबुकने म्हटले आहे.
हेही वाचा - कामगारांसाठी गुड न्यूज! 2021 मध्ये 87% कंपन्या वेतनात वाढ करणार - सर्वेक्षण