ETV Bharat / business

'या' मुद्द्यावरून सरकार-फेसबुकमध्ये पडली वादाची ठिणगी

author img

By

Published : Sep 15, 2019, 1:27 PM IST

मूळ संदेश कुठून आला आहे, याची ओळख जाहीर करण्याला फेसबुकचा विरोध आहे. अशी ओळख जाहीर केली तर वैयक्तिक गोपनियता आणि 'इंड टू इंड एन्क्रिप्शन'चे तंत्रज्ञान संपणार असल्याचा फेसबुकचा दावा आहे.

संंग्रहित - फेसबुक

नवी दिल्ली - कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना व्हॉट्सअॅप मेसेजबाबत माहिती देणारी यंत्रणा देण्याची फेसबुकने तयारी दर्शविली आहे. मात्र केंद्र सरकार मूळ संदेश कुठून आला आहे, ही माहिती फेसबुककडून मागविण्यावर ठाम आहे. यावरून केंद्र सरकार आणि व्हॉट्सअॅप कंपनीमध्ये वादाची ठिणगी उडाल्याचे सूत्राने सांगितले.

मूळ संदेश कुठून आला आहे, याची ओळख जाहीर करण्याला फेसबुकचा विरोध आहे. अशी ओळख जाहीर केली तर वैयक्तिक गोपनियता आणि इंड टू इंड एन्क्रिप्शनचे तंत्रज्ञान संपणार असल्याचा फेसबुकचा दावा आहे.

हेही वाचा-फेसबुक अविश्वासार्ह पोस्टवर आणणार मर्यादा

फेसबुकचे जागतिक कार्यकारी अधिकारी निक क्लेग यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची नुकताच भेट घेतली होती. या बैठकीत प्रसाद यांनी मूळ संदेश शोधून काढण्यासाठी मशिन इंटेलिजिन्सचा पर्याय सूचविला. तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थाला मदत करम्यासाठी काही उपकरणेही देण्याची ऑफर केली.

हेही वाचा-अबब... घरात चोरी करणारा निघाला पत्नीचा फेसबुक फ्रेंड

फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले, की फेसबुकला भारतामधील लोकांच्या सुरक्षिततेची काळजी आहे. आम्ही सरकारबरोबर झालेल्या बैठकीत गोपनीयता आणि सुरक्षितता ठेवण्याबाबत बांधिलकी दाखविली आहे. या समान उद्देशाने सरकारबरोबर काम करू शकतो, असे फेसबुकच्यावतीने सांगण्यात आले.

व्हॉट्सअॅपचे मेसेज इन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे ते कोणालाही वाचता येत नाही. क्लेग्ग यांनी १२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोव्हाल आणि रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. सरकारला माहिती देण्यासाठी नियमांचे पालन करू, असे फेसबुकने म्हटले आहे. मात्र व्हॉट्सअॅपवरील मेसेज वाचणे शक्य नसल्याची भूमिका कंपनीने स्पष्ट केली आहे.

हेही वाचा-फेसबुकला ३४ हजार ५०० कोटीचा दंड, कंपनीकडून मुख्य गोपनीय अधिकाऱ्याची नियुक्ती

व्हॉट्सअॅपचे भारतात ४०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. फेसबुकचे ३२८ दशलक्षहून अधिक वापरकर्ते आहेत. देशातील समाज माध्यमे ही खोट्या बातम्या, गोपनियतेचा भंग आणि विनापरवानगी अॅपमधून गोपनीय माहिती शेअर करणे या कारणांनी अडचणीत सापडली होती.

Intro:Body:

business mar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.