ETV Bharat / business

देशातील 'या' ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे प्रचंड! मोजावे लागतात प्रति स्क्वेअर फुट १० हजार रुपयांपेक्षा जास्त - office rent

सीबीआरईकडून जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणावरील कार्यालयांच्या भाड्यांची माहिती अद्ययावत ठेवली जाते. या यादीत  सलग दुसऱ्यांदा हाँगकाँगचा मध्यवर्ती जिल्हा हा जगातील सर्वात महागडे कार्यालय दर असलेले ठिकाण ठरले आहे. त्या ठिकाणी कार्यालय भाड्याने घेण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट ३२२ डॉलर मोजावे लागतात.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 10, 2019, 1:42 PM IST

Updated : Jul 10, 2019, 3:16 PM IST

नवी दिल्ली - महानगरांमध्ये गगनचुंबी इमारतीमधील कार्यालयांचे महागडे दर ही नवी गोष्ट नाही. मात्र राजधानीतील कॅनॉट प्लेस हे ठिकाण जगातील महागड्या कार्यालयांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आले आहे. येथील कार्यालयांचा भाड्यांचा दर प्रति स्क्वेअर फूट हा १४४ डॉलर म्हणजे सुमारे १० हजार ८० रुपये एवढा आहे. ग्लोबल प्राईम ऑफिस ऑक्युपटन्सी कॉस्ट सर्वेच्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

सीबीआरईकडून जगभरातील महत्त्वाच्या ठिकाणावरील कार्यालयांच्या भाड्यांची माहिती अद्ययावत ठेवली जाते. या यादीत सलग दुसऱ्यांदा हाँगकाँगचा मध्यवर्ती जिल्हा हा जगातील सर्वात महागडे कार्यालय दर असलेले ठिकाण ठरले आहे. त्या ठिकाणी कार्यालय भाड्याने घेण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट ३२२ डॉलर मोजावे लागतात.

मुंबईतील कार्यालयांचे भाड्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. मुंबई वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचे यादीमधील स्थान २६ वरून २७ व्या तर नरिमन पाँईटचे यादीमधील स्थान ३७ वरून ४० व्या स्थानावर घसरले आहे. वांद्रा कॉम्प्लेक्समध्ये भाड्यापोटी प्रति स्क्वेअर फूट ९०.६७ रुपये मोजावे लागतात. तर नरिमन पाँईटमधील कार्यालयाच्या भाड्यासाठी ६८.३८ डॉलर स्क्वेअर फूट खर्च येतो.

काय म्हटले आहे अहवालात-
देशातील विविध शहरात असलेल्या महत्त्वाच्या जागा गुंतवणुकीसाठी मोठी बाजारपेठ आहेत. त्यामुळे ग्लोबल कॉर्पोरेट कंपन्यांकडून देशातील विविध शहरात कार्यालये सुरू करण्याला पसंती दिली जात आहे. ही माहिती अंशुमन मॅगझीनचे चेअरमन आणि सीईओ यांनी दिली. व्यावसायिक कार्यालयांची बाजारपेठ ही स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या विकासाला चालना देणारी ठरली आहे. दिल्ली हे मोक्याच्या ठिकाणावरील बाजारपेठेत जगात १० व्या क्रमांकाचे महागडे शहर ठरले आहे. शहरातील कमी पुरवठा आणि आधुनिक बांधकामातील पाईपलाईन यामुळे किमती वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

कार्यालयाचे भाडे फ्लॅटच्या किमतीहून अधिक-

पुण्यातील फ्लॅटची खरेदी किंमत साधारणत : ५ हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढी आहे. त्या तुलनेत दिल्लीतील कॅनॉट प्लेसचे कार्यालयीन भाडे हे दुप्पट म्हणजे साधारणत: १० हजार रुपये आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.