जयपूर - योगगुरू रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली असतानाच त्यांच्याच संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पतंजली आयुर्वेद डेअरी उद्योगाचे सीईओ सुनिल बन्सल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या समस्येमुळे पतंजलू डेअरी उद्योगाचे सीईओ सुनिल बन्सल मृत्यू १९ मे रोजी झाला. ५७ वर्षीय बन्सल यांचे फुफ्फुस खराब झाले होते. तसेच ब्रेन हॅमरेजही झाला होता, अशी माहिती जयपूरमधील राजस्थान रुग्णालयाने दिली आहे. बन्सल हे दुग्धोत्पादन शास्त्रात विशेष तज्ज्ञ होते. त्यांनी पतंजली डेअरी उद्योगाची २०१८ पासून कमान सांभाळली होती.
हेही वाचा-अॅलोपॅथी उपचार पद्धतीविरोधातील विधान मागे घ्या; आरोग्य मंत्र्यांचे रामदेव बाबांना पत्र
योगगुरू रामदेव हे वादग्रस्त विधानामुळे आले आहेत चर्चेत
कोरोनाचा देशात कहर असून रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. तर दुसरीकडे रामदेव बाबा यांनी आपल्या वक्तव्यातून डॉक्टरांच्या भावना दुखविल्या आहेत. रुग्णांच्या मृत्यूला अॅलोपॅथीची औषधे जबाबदार असल्याचे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयएमएने यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
हेही वाचा-योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केली दिलगिरी, वक्तव्य घेतले मागे
काय म्हणाले होते रामदेव बाबा?
रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटलं. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्ये केले. उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. हायड्रोक्लोरिक्विन फेल झाले. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरले. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथीउपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे.