नवी दिल्ली - बीएसएनल अमरनाथ यात्रेकरुंना खास प्रि लोडेड प्रीप्रेड कार्ड देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये इतर राज्यातील सीमकार्ड चालत नाही. अशा परिस्थितीत बीएसएनलच्या सीमकार्डमुळे यात्रेकरुंची चांगली सोय होणार आहे.
सुरक्षा नियमामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांना रोमिंगची सेवा देत येत नाही. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत असते. ही बाब लक्षात घेवून केंद्रीय गृह आणि दूरसंचार मंत्रालयाने अमरनाथ यात्रेकरुंना प्रीपेड सीमकार्ड देण्याची बीएसएनएलला परवानगी दिली आहे.
असे असणार सीमकार्ड-
अमरनाथ यात्रेकरुंना खास प्रि लोडेड प्रीप्रेड कार्ड मिळणार आहे. या कार्डची किंमत २३० रुपये असणार आहे. त्यामध्ये ३३३ मिनिटाचा टॉकटाईम आणि १० दिवसांची मुदत असलेला १.५ जीबी डाटा मिळणार आहे.
यात्रेकरू मोठ्या प्रमाणात सीम कार्ड घेतील अशी अपेक्षा आहे. मोबाईलवर चांगला आवाज आणि लघुसंदेश (मेसेज) याला प्राधान्य असल्याचे बीएसएनएलने म्हटले आहे. हे सीम कार्ड यात्रेकरुंना पर्यटक स्वागत केंद्रावर तसेच विविध छावण्यांवर मिळणार आहे. सीमकार्ड घेण्यासाठी ओळख आणि पत्ता यांचा पुरावा असलेली कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून सुरुवात झाली असून ती १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.