वॉशिंग्टन - जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. परोपकारी सेवांसाठी अधिक वेळ देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये जागतिक आरोग्य आणि विकास, शिक्षण आणि बदलत्या हवामानाच्या आव्हानावर मात करणे यांचा समावेश आहे.
मायक्रोसॉफ्टसह बर्केशायर हॅथवे या कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा बिल गेट्स यांनी निर्णय घेतला आहे. गेट्स म्हणाले, की बर्कशायर कंपनी आणि मायक्रोसॉफ्टचे नेतृत्व यापूर्वी कधीही एवढे बळकट नव्हते. त्यामुळे योग्य वेळी बाहेर पडण्याचा निर्णय आहे.
गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २५ वर्षे काम केले आहे. त्यांनी २००० मध्ये स्टीव बॉल्मर यांच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपविली. तर सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची २०१४ मध्ये जबाबदारी घेतली आहे. बिल गेट्स यांनी पॉल एलेन यांच्यासमवेत १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती.
हेही वाचा-येस बँकेच्या ग्राहकांना तात्पुरता दिलासा, १८ मार्चला हटणार निर्बंध