सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापारी युद्ध सुरू केले आहे. अशा व्यापारी युद्धातून कंपनीच्या उत्पादनांची सुटका करणे शक्य झाल्याचे अॅपलचे मुख्य कार्यकारी टीम कुक यांनी सांगितले, अशी स्थिती कायम राहील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
चिनी लोकांनी अॅपलला मुळीच लक्ष्य केले नाही. तसे घडत असल्याचे मी स्विकारणार नाही, असे प्रामाणिकपणाने सांगत असल्याचे कुक म्हणाले. आयफोनच्या किमती १४ टक्क्यांनी वाढतील असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता. मात्र तसे घडले नसल्याचे कुक यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून गेल्या आठवड्यात चीनने अमेरिकन उत्पादनांवरील आयात शुल्क हे २५ टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कमी दरातील मनुष्यबळ आणि कर सवलतीमुळे अॅपलचे चीनमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत.
अॅपलवर बहिष्कार टाकण्याचीही यापूर्वी राबविण्यात आली होती मोहीम -
चीनमध्ये नागरिकांनी अॅपलवर बहिष्कार टाका, अशी सोशल मीडियामध्ये मोहीम राबविली होती. अॅपल टाळून हुवाई स्मार्टफोन विकत घेण्यासाठी चीनी कंपन्यांनी डिसेंबरमध्ये ग्राहकांना मोठ्या सवलती दिल्या होत्या. २० हून अधिक चिनी कंपन्यांनी हुवाई उत्पादनांची खरेदी वाढविणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. चीनच्या न्यायालयाने डिसेंबरमध्ये आयफोनच्या बहुतांश मॉडेलच्या खरेदी व विक्रीवर बंदी घातली होती.