नवी दिल्ली - रिलायन्स कम्युनिकेशन्सचे मालक असलेल्या अनिल अंबानी यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स ही सध्या आर्थिक अडचणीत सापडलेली आहे.
अनिल अंबानी यांच्याव्यतिरिक्त छाया विरानी, रिना करानी यांच्यासह इतर दोन संचालकांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. संचालक मणीकांतन व्ही. आणि मुख्य वित्तीय अधिकारी यांनी यापूर्वीच पदाचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे कंपनीच्या कमिटीपुढे विचारासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
हेही वाचा-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ; ग्राहकांच्या खिशाला कात्री
रिलायन्स कम्युनिकेशन्स ही सध्या नादारी प्रक्रियेमधून जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने थकित रक्कम (एजीआर) दूरसंचार विभागाला देण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. त्याचा फटका बसून रिलायन्स कंपनीला चालू वर्षाच्या जूलै-सप्टेंबरच्या तिमाहीत 30 हजार 142 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.