नवी दिल्ली - अॅमेझॉन गुंतवणूक करून देशावर मेहेरेनजर दाखवत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस यांनी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतणूक करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले होते. त्यावर गोयल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बाजारातील किमती प्रभावित कमी करूनही ई-कॉमर्स कंपन्या मोठा तोटा कसा सहन करू शकतात? असा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सवाल केला. पुढे ते म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांनी भारतीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मल्टी ब्रँडच्या किरकोळ प्रकारामधून मागल्या दाराने त्रुटी शोधू नये. भारताने मल्टी ब्रँडच्या किरकोळ विक्रीत ४९ टक्क्यांहून अधिक थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली नाही. तसेच अद्याप कोणत्याही विदेशी कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा-जाणून घ्या, व्यापार विषयक संक्षिप्त घडामोडी
अॅमेझॉन अब्ज डॉलर गुंतवू शकते. मात्र, अॅमेझॉन दरवर्षी अब्जावधी डॉलर नुकसान सहन करत आहे. अॅमेझॉन अब्जावधी डॉलरचा वित्तपुरवठा करत आहे. याचाच अर्थ ते भारतामधील गुंतवणूक ही मेहेरेनजरसाठी करत नाहीत. लघू आणि मध्य व्यवसायांना ऑनलाईन माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने १ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी कंपनीने ५.५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांची 'एजीआर'वरील पुनर्विचार याचिका फेटाळली
कंपनीकडून गेल्या काही वर्षात गोदामासह काही प्रक्रियांसाठी गुंतवणूक करण्यात येत आहे. हे स्वागतार्ह आणि चांगले आहे. मात्र, त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीत आणला जात आहे. त्यामुळे ई-कॉमर्स बाजारपेठेच्या मॉडेलचे नुकसान होत आहे.