ETV Bharat / business

एअर इंडियाची देश-विदेशातील निवडक मार्गांवर 'या' तारखेपासून सुरू होणार सेवा

टाळेबंदीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व विमान प्रवास सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

एअर इंडियाच्या वेबसाईटवरील मजकूर
एअर इंडियाच्या वेबसाईटवरील मजकूर
author img

By

Published : Apr 18, 2020, 7:06 PM IST

Updated : Apr 18, 2020, 7:21 PM IST

नवी दिल्ली - देश-विदेशातील उड्डाणे स्थगित केली असताना एअर इंडियाची सेवा पुन्हा सुरू होणार आहे. एअर इंडियाची देशातील विमान सेवा टाळेबंदी संपल्यांनंतर ४ मेपासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे ही १ जूनपासून सुरू होणार आहेत.

जगभरात आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असताना एअर इंडियाने देशातील विमान प्रवासाची तिकिट बुकिंग सेवा ३ मेपर्यंत थांबविली आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकिटे ३१ मे २०२० पर्यंत आरक्षणासाठी स्थगित केल्याचे एअर इंडियाने वेबसाईटवर म्हटले आहे.

हेही वाचा-'कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करा'

देशातील विमान प्रवासासाठी ४ मे तर विदेशातील प्रवासासाठी १ जूनपासून तिकिटे बुकिंग करता येतील, असे कंपनीने म्हटले आहे. देशात २५ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान टाळेबंदी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात संधी शोधणाऱ्या चीनला बसणार पायबंद; सरकारने काढले हे आदेश

Last Updated : Apr 18, 2020, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.