नवी दिल्ली - अदानी ट्रान्समिशन लि. (एटीएल) कंपनीला महाराष्ट्रात वीज पारेषण प्रकल्प उभारण्याची परवानगी मिळाली आहे. त्याबाबत सामंजस्य पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीने एटीएलला दिले आहे.
वीज वितरण करण्यासाठी प्रकल्प उभी करण्याची एटीएलला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एटीएल कंपनी महाराष्ट्रात स्वत:चा विद्युत प्रकल्प उभा करू शकणार आहे. ही परवानगी आगामी ३५ वर्षांसाठी देण्यात आलेली आहे. एटीएलचा 'खारघर विक्रोळी ट्रान्समिशन' कंपनीचा प्रकल्प हा मुंबईच्या विक्रोळीमध्ये असणार आहे. हे ४०० केव्हीचे मुंबईमधील पहिले उपकेंद्र असणार आहे. मुंबईची वाढती वीजेची गरज पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असणार आहे. मुंबईमधील वीजदर कमी होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबई - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका
एटीएल ही अदानी ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे. ही देशातील सर्वात मोठी खासगी पारेषण कंपनी आहे. देशात कंपनीचे १४ हजार ७३८ सर्किट किलोमीटरचे नेटवर्क आहे.