ETV Bharat / business

'सैन्यदलाच्या सुविधा मिळाल्याने शस्त्रास्त्रे वेगाने विकसित होण्यात मदत होणार'

author img

By

Published : Feb 7, 2020, 6:29 PM IST

बाबा कल्याणी यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, आमच्याकडे सहा प्रकारच्या तोफा आहेत. कमी वेळात तोफा तयार करण्याचा जागतिक विक्रम आहे, असे मला वाटते.

Baba Kalyani
बाबा कल्याणी

लखनौ - केंद्र सरकारने खासगी संरक्षण कंपन्यांना भारतीय सैन्यदलाची चाचणी केंद्र वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नवी शस्त्रास्त्र व्यवस्था वेगाने विकसित होण्यासाठी मदत होणार असल्याचे कल्याणी ग्रुपचे चेअरमन बाबा कल्याणी यांनी म्हटले. ते लखनौमधील डिफेन्स एक्स्पोमध्ये बोलत होते.

बाबा कल्याणी यांनी ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिली. ते म्हणाले, आमच्याकडे सहा प्रकारच्या तोफा आहेत. कमी वेळात तोफा तयार करण्याचा जागतिक विक्रम आहे, असे मला वाटते. पुढे ते म्हणाले, देशात उत्पादन क्षमतांचा विकास केल्यास संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया'चे धोरण राबविणे शक्य आहे. संरक्षण उद्योगाची क्षमता, शक्यता आणि गुंतवणूक विकसित करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी कधीच क्षमता नव्हती, असे तंत्रज्ञान तयार करण्याची गरज आहे.

हेही वाचा-पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएलची मालमत्ता विकण्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

सैन्यदलाचे चाचणी केंद्र मिळाल्याने उत्पादने वेगाने विकसित करण्याची पात्रता वेगाने निर्माण होणार आहे. कल्याणी ग्रुपला १९९९ मधील कारगील युद्धात बोफार्ससाठी तोफगोळे तयार करण्याचे कंत्राट मिळाले होते. तेव्हा कल्याणी ग्रुपला उद्योग विस्तारण्याची मोठी संधी मिळाली होती.

हेही वाचा-कोरोनाचा धसका : चीनसह म्यानमारमधून आयात होणाऱ्या अन्नपदार्थांवर मणिपूरची बंदी

कल्याणी ग्रुपकडून सहा लांब आणि मध्यम टप्प्याच्या भारतीय सैन्यासाठी तोफा बनविण्यात येतात. याशिवाय विदेशातील ग्राहकांसाठी बंदुका तयार करण्यात येतात.
सध्या तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. एखादे उत्पादनतयार करायला तुम्ही १० वर्षे घेवू शकत नाही. ते कालबाह्य होते, असे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.