बंगळुरू - टीव्हीएस मोटार कंपनीने कोरोनाच्या लढ्यात सरकारला मोलाची मदत केली आहे. टीव्हीएसने कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याकडे ३ हजार पीपीई आणि १० हजार एन-९५ मास्क दिले आहेत.
कोरोनाच्या संकटात लढणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी तसेच स्थलांतरित मजुरांना नियमितपणे मास्क, वापरून फेकण्यात येणारे हातमोजे आणि अन्न नियमितपणे टीव्हीएस कंपनीकडून देण्यात येत आहे. टीव्हीएस कंपनीने निर्जंतुकीकरण करणारे अनेक वाहने बंगळुरूच्या परिसरात ठेवली आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या कोरोनाच्या संकटात मदती साठी सरसारवल्याचे दिसत आहे. यामध्ये रिलायन्स, टाटा, विप्रो आदी कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-फेसबुकची जिओत ४३,५७४ कोटींची गुंतवणूक; उद्योग जगतामधून स्वागत