ETV Bharat / business

जाणून घ्या, गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची कारणे - global LPG prices

गॅस सिलिंडरचे इतके दर का वाढत आहेत, हा खरा प्रश्न आहे. हे जाणून घेण्यापूर्वी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढण्याचे सूत्र समजून घेतले पाहिजे.

LPG prices
एलपीजी गॅस सिलिंडर
author img

By

Published : Mar 3, 2021, 7:42 PM IST

हैदराबाद (तेलंगाणा) - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने महागाईचा वणवा भडकला आहे. त्यामध्ये खाद्यतेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीची भर पडली आहे. अशा महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरचे दर डिसेंबरपासून १७५ रुपयांनी वाढले आहेत. फेब्रुवारीमध्ये दर चार वेळा वाढल्याने गॅस सिलिंडर हे १२५ रुपयांनी महागले आहे. या दरवाढीनंतर १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ७१९ रुपयांवरून ८१९ रुपये झाली आहे. गॅस सिलिंडरचे इतके दर का वाढत आहेत, हा खरा प्रश्न आहे. हे जाणून घेण्यापूर्वी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढण्याचे सूत्र समजून घेतले पाहिजे.

हेही वाचा-साखरेच्या उत्पादनात फेब्रुवारी २०२०-२१ मध्ये २० टक्क्यांची वाढ

एलीपीजीच्या किमती कशा निश्चित केल्या जातात ?

  • एलपीजीची किंमत ही इम्पोर्ट पॅरिटी फॉर्म्युलावर (आयपीपी) निश्चित केली जाते. आयपीपी ही आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीच्या किमान किमतीवरून निश्चित केली जाते. एलपीजी देशात आयात करण्यात येते, असे गृहित धरण्यात येते.
  • सौदी अरेबियाची अ‌ॅरेम्को कंपनीचे जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत वर्चस्व आहे. या कंपनीने लागू केलेल्या तेलाच्या किमतीचा दर एलपीजीच्या किमतीसाठी विचारात घेतला जातो.
  • वाहतुकीचा खर्च, गॅस सिलिंडर पॅकेजिंगचा खर्च, विपणन करण्यासाठीचा खर्च आणि सरकारी तेल कंपन्यांना मिळणारा फायदा, डीलरला मिळणारे कमिशन आणि जीएसटी या गोष्टी लक्षात घेण्यात येतात. त्यानंतर विनाअनुदानित एलीपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करण्यात येते.

हेही वाचा-सलग तीन दिवस शेअर बाजारात तेजी; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ९.४१ लाख कोटींची वाढ

एलपीजीच्या दरात अचानक कशामुळे वाढ झाली?

  • आयपीपीच्या सुत्रानुसार देशातील एलपीजीच्या किमती या जागतिक पातळीवरील एलपीजीच्या किमतीवरून निश्चित केल्या जातात. सौदी अ‌ॅरेम्कोकडून एलपीजीच्या किमती वाढविण्यात आल्यानंतर देशातही किमती वाढविण्यात येतात.
  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नियोजन आणि विश्लेषण विभागाच्या माहितीनुसार सौदी अ‌ॅरेम्कोकडून एलपीजीच्या किमती मे २०२० मध्ये वाढून प्रति मेट्रिक टनासाठी २५७.३३ डॉलर होती. तर फेब्रुवारी २०२१ मध्ये एलीपीजी मेट्रिक टनासाठी ५२९.८० डॉलर किंमत आहे.
  • जागतिक बाजारात एलपीजीची किंमत दुप्पटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे प्रमुखत: देशातील एलपीजीची किंमत वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.