नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एमएमएमई क्षेत्राकरता आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर विविध मंत्रालयांनी भिन्न मत व्यक्त केली आहेत. त्यावरून काँग्रेसने पॅकेजवर उपहासात्मक टीका केली आहे.
सरकार आणि सार्वजनिक कंपन्यांकडून एमएसएमईचे थकित असलेले ५ लाख कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३ लाख कोटींची ४५ लाख कर्जे ही एमएसएमई क्षेत्राला देणार असल्याचे सांगितले. त्यावर पी. चिदंबरम यांनी कोण कर्ज देणार आहे व कोण कर्ज घेणार आहे, असा प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पॅकेजमध्ये 'हा' घटक पुन्हा राहिला वंचित
सीतारामन यांनी एमएसएमईसह उद्योगांना ३ लाख कोटींचे स्वयंचलित कर्ज देणार असल्याचे जाहीर केले. या योजनेत २५ कोटी रुपयापर्यंतचे थकित कर्जदार आणि १०० कोटींची उलाढाल असलेले उद्योग विशेष कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. हे कर्ज ४ वर्षांच्या मुदतीसाठी असणार आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी १०० टक्के कर्जाची हमी दिली जाणार आहे. हे पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा भाग आहे.
हेही वाचा-जागतिक बँकेचा भारताला मदतीचा हात; एवढे देणार अर्थसहाय्य